निसर्गाशी हितगुज करायची असेल तर चार भिंतीच्या बाहेर पडणे गरजेचे आहे निसर्गातील अनुभव देण्यासाठी अमचे जीवन अनुभव शिबीर शुक्रवार दि २२/११/२०१९ व शनिवार दिनांक २३/११/२०१९ रोजी बदलापूर येथील आंबेशिब गावातील रामदास आश्रम येथे गेले होते.
आदिवासी पाड्यात फेर-फटका मारतांना अादिवासी जीवन मुलांनी जवळून पाहीले. त्यांची कुडाची घरे, चार चार हंडी डोक्यावर घेऊन पाणी अाणणार्या स्रिया पाहून मुलांना आश्चर्य वाटले.
तेथील आदिवासींना मुलांनी आणलेले कपडे दिले.त्यावेळेचा मुलांना होणार आनंद वेगळाच होता.त्याच्या सोबत भात झोडपणीचा अनुभव मुलांनी घेतला. तिथल्या अादिवासी शाळेत मुलांनी भेट दिली.
वैशाली ताईंच्या गाणाच्या ठेक्यावर विदयार्थानीही ठेका धरला.रामदास आश्रमातील गरमा गरम भोजनाचा अास्वाद विदयर्थानी चांगलाच घेतला. रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती फेर धरला.